बाळ इथे निजला….शिवाचा….बाळ इथे निजला!
भीमा-इंद्रायणी तिरी, वढु-तुळा संगमावरी;
मृत्युंजय संभाजी पाहून, मृत्यु ही थिजला….
बाळ इथे निजला….शिवाचा….बाळ इथे निजला!
बाळ इथे निजला….शिवाचा….बाळ इथे निजला!
संभाजी….वाघा सम आले
संभाजी….शिवबा सम जगले
संभाजी….सिंहा सम गेले
संभाजी….जगी अमर झाले
मरणाले तरी शरण ना कधी, स्वार्थाने लाचार ना कधी
जीवन गेले रणांगणी ह्या, हार ना मानली कधी
दुःख सिंधू करूनी पार, मांडून शिवमय हा जागर
पराक्रमाचा सागर झाला करूणेचा आगर….करूणेचा आगर
दगडाचा सह्याद्री आता…अश्रूंनीऽऽऽ भिजलाऽऽऽ….
बाळ इथे निजला….शिवाचा….बाळ इथे निजला!
बाळ इथे निजला….शिवाचा….बाळ इथे निजला!
(लेखक/कवी/गीतकारांची अद्याप मला माहिती नाही. त्याबद्दल क्षमस्व!)
Comments
Post a Comment