भीमा - इंद्रायणी तिरी , वढु - तुळा संगमावरी ; मृत्युंजय संभाजी पाहून , मृत्यु ही थिजला …. बाळ इथे निजला …. शिवाचा …. बाळ इथे निजला ! बाळ इथे निजला …. शिवाचा …. बाळ इथे निजला ! संभाजी …. वाघा सम आले संभाजी …. शिवबा सम जगले संभाजी …. सिंहा सम गेले संभाजी …. जगी अमर झाले मरणाले तरी शरण ना कधी , स्वार्थाने लाचार ना कधी जीवन गेले रणांगणी ह्या , हार ना मानली कधी दुःख सिंधू करूनी पार , मांडून शिवमय हा जागर पराक्रमाचा सागर झाला करूणेचा आगर …. करूणेचा आगर दगडाचा सह्याद्री आता … अश्रूंनीऽऽऽ भिजलाऽऽऽ…. बाळ इथे निजला …. शिवाचा …. बाळ इथे निजला ! बाळ इथे निजला …. शिवाचा …. बाळ इथे ...