“ज्या ज्या क्षणी तू अधिकाधिक निर्दोष व अधिकाधिक उन्नत होत आहेस, त्या त्या क्षणी तू मोठाच होत आहेस.” - साने गुरूजींच्या पुस्तकातून
हे वाक्य साने गुरूजींच्या “श्यामची आई” किंवा “आपण सारे भाऊ” या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकातून आहे जी पुस्तकं मी जवळपास एक वर्षापूर्वी वाचली होती. आज साने गुरूजींच्या पुण्यस्मरण दिनी हे वाक्य आठवलं आणि ते नेमकं कुठे आहे हे शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला पण काही सापडलं नाही. परंतु विशेष म्हणजे ज्या दिवशी हे वाक्य वाचलं होतं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते माझ्या बरोबर लक्षात आहे. बहुदा ही थोर वाक्य अशीच असतात, यांच्या गाथा एकवेळ पाण्यात बुडतात पण हे विचार लोकांच्या मनामध्ये अनंतकाळ तरंगत राहतात!