॥माझी माय सरस्वोती, माले शिकवते बोली; लेक बहिणाच्या मनी, किती गुपित पेरली॥ - बहिणाबाई
॥माझी माय सरस्वोती, माले शिकवते बोली; लेक बहिणाच्या मनी, किती गुपित पेरली॥
माझी माय सरस्वोती….
॥माझ्यासाठी पांडुरंगा, तुझं गीता भागवत; पावसात समावतं, माती मधी उगवतं॥
माझी माय सरस्वोती….
॥अरे देवाचं दरसन, झालं झालं आपसुक; हिरी दातं सूर्याबापा, दायी अरूपाचं रूप॥
माझी माय सरस्वोती….
॥तुझ्या पायाची चाहूल, लागे पाना-पाना मधी; देवा तुझं येनं जानं, वारा सांगे कानामधी॥
माझी माय सरस्वोती….
Comments
Post a Comment