॥वाटंच्या वाटसरा, वाट बिकट मोठी॥ - बहिणाबाई

॥तुझ्या पायांनी जानं, तुझा तुलेच जीव; लावली पार आता, तुझी तुलेच नाव॥

॥मतलबाचे धनी, सर्वी माया रे खोटी; वाटंच्या वाटसरा, वाट बिकट मोठी॥

॥दोन्ही बाजूंनी दऱ्या, धर झुडूप हाती; सोडू नको रे धीर, येवो संकट किती॥

॥येऊ दे परचिती, काय तुझ्या ललाटी; वाटंच्या वाटसरा, वाट बिकट मोठी॥

Comments

Popular posts from this blog

॥दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहचे गेले पाणी; ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली॥

है कथा संग्राम की